आंबेगाव: नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. मोनिका बाणखेले यांना विविध प्रभागांमधून उत्स्फूर्त पाठिंबा
Ambegaon, Pune | Nov 27, 2025 मंचर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या युतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ. मोनिकाताई सुनील बाणखेले यांनी आज मंचर शहरातील विविध प्रभागांमध्ये जोरदार दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी संबंधित प्रभागांमधील नगरसेवक पदाच्या उमेदवारांसोबत संयुक्तपणे मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.