महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी २०२६ अवघ्या एका दिवसांत सुरू होणार असल्याचे संकेत मिळत असताना त्याआधीच अकोल्याच्या भारतीय जनता पार्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे. यादरम्यान, शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये जाऊन भाजपकडून २०१७ ते २०२५ या कालावधीत करण्यात आलेल्या विकासकामांचा जाहीरनामा घरोघरी वाटप करण्यात येत आहे. या माध्यमातून मतदारांपर्यंत थेट पोहोचत प्रचाराची सुरुवात करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पूर्वतयारी असून, भाजपकडून प्रत्येक प्रभागात प्रचार सुरू