भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत अवघ्या चार तासांत आरोपीला अटक करून चोरीस गेलेला २ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात बाजारपेठ पोलिसांना आज यश आले आहे. या कारवाईमुळे शहरात पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत समाधान व्यक्त होत आहे.