साकोली: साकोलीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन,नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी नगरपरिषद येथे उमेदवारी अर्ज दाखल
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने साकोली येथील लहरी बाबाच्या मठातून सोमवार दि17 नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता रॅली कडून शक्तिप्रदर्शन करत नगरपरिषद मध्ये अधिकृत नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी नगर परिषदेमध्ये नामांकन दाखल केले.साकोली नगरपरिषद येथे नगराध्यक्ष पदासाठी 16 उमेदवारांनी तर नगरसेवक पदासाठी 171 नामांकन दाखल झाली आहेत.नगर परिषदेमध्ये एकूण 20 नगरसेवकांच्या जागा आहेत.