निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खामगाव शहर पोलीस व शिवाजीनगर पोलीस यांच्यावतीने आज दिनांक २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजे दरम्यान पोलीस मैदान येथे दंगा काबू प्रशिक्षण घेण्यात आले. नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक च्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून पोलीस मैदान येथे दंगा काबू प्रशिक्षण घेण्यात आले. घेण्यात आलेल्या प्रशिक्षणामध्ये जमावाने दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी जमावाला कसे पांगवावे याबद्दल प्रशिक्षण दिले.