दिवाळीपर्यंत सुरू राहिलेल्या अवकाळी पावसाने सोयाबीनचे पीक अक्षरशः वाहून नेले, आणि ज्या कापसावर शेतकऱ्यांनी शेवटची आशा ठेवली होती. अकोल्यातील दहीगाव गावंडे सह इतर भागात आता बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. वर्षभर कर्ज काढून, लाखो रुपये खर्च करून, फवारण्या, सिंचन, खतांचा भार उचलत शेतकऱ्यांनी पीक वाढवले. शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे, कापसावर केलेला खर्च निघेल की, नाही याचीही शाश्वती राहिलेली नाही..