नांदेड मध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणातून सक्षम ताटे या युवकाची हत्या करण्यात आली होती. आज दिनांक पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान जुना गंज येथे मयत समक्ष ताटे याच्या कुटुंबाला आणि त्याची प्रेयसी आंचल मामीडवार हिला पोलीस सुरक्षा देण्यात आली . 27 नोव्हेंबर रोजी सक्षम ताटे याची हत्या करण्यात आली .. या प्रकरणी आँचलचे वडील , दोन्हीं भाऊ आणि अन्य तीन आरोपी अटक आहेत .. दोघे फरार आहेत .. दरम्यान सक्षमच्या कुटुंबांला धोका असुन सुरक्षा देण्याची मागणी आँचलने केली होती.