शिरपूर तालुक्यातील खामखेडा रस्त्यावर 17 डिसेंबर 2025 रोजी पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास अज्ञात कारणामुळे चालत्या कारने अचानक पेट घेतल्याने कारमधील चालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वाहन धारकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.चंद्रकांत प्रताप धिवरे वय 40 रा.खामखेडा प्रथा ता.शिरपूर हमू सुरत असे मयत चालकाचे नाव आहे.