आज दिनांक 9 डिसेंबर रोजी रात्री 12च्या सुमारास भिवंडी येथील काल्हेर येथे साईबाबा मंदिराजवळ धावत्या ट्रकने दोघांना जोरदार धडक दिली आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून दुसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. काही प्रत्यक्षदर्शीनुसार बाईक स्लिप झाल्याने अपघात झाला आहे. माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यासंदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत.