मुखेड: सावरगाव येथून अज्ञात चोरट्याने फिर्यादीची मोटरसायकल केली लंपास मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Mukhed, Nanded | Nov 30, 2025 दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सकाळी सहाच्या दरम्यान फिर्यादीचे घरासमोर सावरगाव ता.मुखेड जि. नांदेड येथे, यातील फिर्यादीची हिरो होंडा शाईन कंपणीची मोटार सायकल क्रमांक एमएच-26/बीएन-7639 किंमती 55,000/-रूपयाची नमुद ठिकाणावरून कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली वगैरे फिर्यादी सधामखान रब्बानीखान पठाण, वय 35 वर्षे, रा. सावरगाव पीर ता. मुखेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन मुखेड पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात आरोपी विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास पोहेकों/कदम, हे करीत आहेत.