बांगलादेश सरकारने ७ डिसेंबरपासून मर्यादित प्रमाणात कांदा आयातीस परवानगी दिली आहे. दररोज ५० आयपी धारकांमार्फत सुमारे १५ हजार क्विंटल कांदा भारतातून बांगलादेशला जाण्याची शक्यता असतानाही, सोमवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या लिलावात समाधानकारक वाढ दिसून आली नाही. गावठी व लाल कांद्याच्या दरात संमिश्र बदल दिसले तर एकूण आवक १२,९७० क्विंटल इतकी नोंदण्यात आली.lq