चाळीसगाव: बिलाखेड गावातील रामवाडी परिसरात गुरुवार, दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३.३५ वाजताच्या सुमारास श्री. वाल्मीक प्रकाश बागुल यांच्या घरात शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली. मात्र, अग्निशमन दलाच्या त्वरित प्रतिसादाने आणि अग्निशमन अधिकारी श्री. अक्षय घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही आग यशस्वीरित्या विझवण्यात आली, ज्यामुळे मोठी हानी टळली.