*आरोग्य जनजागृती उपक्रमांना गती देण्यासाठी आढावा बैठक*- जळगाव : राज्यातील विविध आरोग्य कार्यक्रम आणि योजनांचा प्रभावी प्रसार करून त्या अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आरोग्य सेवा संचालक डॉ कंदेवाड यांच्या अध्यक्षतेखाली DEMO बैठक
3.3k views | Jalgaon, Maharashtra | Nov 13, 2025 **राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे येथे आढावा बैठक घेण्यात आली.* * **राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, डॉ. भगवान पवार, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे, तसेच सहायक संचालक डॉ. संजयकुमार जठार बैठकीला उपस्थित होते. या वेळी राज्यातील आरोग्य जनजागृती उपक्रम, जनसंपर्क मोहिमा, तसेच माध्यमांशी प्रभावी संवाद यावर सविस्तर चर्चा झाली.आरोग्य जनजागृती हा केवळ विभागाचा कार्यक्रम नसून तो एक सामाजिक जबाबदारीचा भाग आहे. प्रत्येक अधिकाऱ्याने त्यासाठी सक्रिय भूमिका बजावली पाहिजे, अशी अपेक्षा बैठीकीचा समारोप करताना डॉ. बाविस्कर यांनी व्यक्त केली. **