भुसावळ नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ ब मध्ये नाट्यमय घडामोडी घडत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार परीक्षित पुंडलिक बहऱ्हाटे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. दि. १० डिसेंबर रोजी त्यांच्या विरोधातील एकमेव उमेदवार असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पीतांबर चौधरी यांनी अनपेक्षितरित्या माघार घेतल्याने बऱ्हाटे यांचा बिनविरोध निवडिचा मार्ग मोकळा झाला आहे.