सांगोला: SC व OBC महिलांसाठी प्रभाग निश्चित; सर्वसाधारण महिलांसाठीही महत्वाचे आरक्षण; टाऊन हॉल येथे कार्यक्रम
सांगोला टाऊन हॉल येथे उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांच्या उपस्थितीत नगरपरिषदेच्या २३ जागांच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया ८ ऑक्टोबर दुपारी १ च्या सुमारास पार पडली. महिलांसाठी १२ जागा निश्चित करण्यात आल्या. अनुसूचित जाती महिलांसाठी प्रभाग क्र. ३ व ८, CBC महिला प्रभाग क्र. १, ६ व ११, तर CBC राखीव प्रभाग क्र. १, ५, ६, ७ व ९ ठरले. सर्वसाधारण महिलांसाठी प्रभाग क्र. २, ४, ५, ७, १० आणि प्रभाग क्र. ११ मधील एक जागा राखीव झाली. प्रक्रिया सुरळीत होत प्रशासनाचे देशमुख यांनी कौतुक केले.