शिरपूर तालुक्यातील तरडी गावाच्या शिवारात बिबट्या सदृश वन्यजीव प्राण्याचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १६ डिसेंबर रोजी सकाळपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत तरडी गावातील लादू गंगाराम पाटील, रमेश जाधव व मनोज ओंकार पाटील यांच्या शेत परिसरात वेगवेगळ्या वेळी बिबट्या सदृश वन्यजीव प्राणी दिसून आला.त्यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली असून नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे तालुक्यातील गाव पोलीस पाटलांकडून करण्यात येत आहे.