जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६च्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू असतानाच शहरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील सावरकर चौक, सिंधी बाजार परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान ओळखपत्रे बेवारस अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवार दि. 11 जानेवारी 2026 रोजी रात्री 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या गंभीर प्रकरणाची निवडणूक प्रशासनाने तात्काळ दखल घेत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.