*पोलीस प्रशासनाकडून खैरी/वलमाझरी गावास भेट; विविध गुन्ह्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती* वलमाझरी: दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक (स.पो.नि.) साळवे साहेब आणि त्यांच्या पथकाने वलमाझरी गावाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान गावातील कायदा व सुव्यवस्था आणि ग्रामपंचायतीच्या कामकाजाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधण्यात आला. ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे कौतुक भेटीदरम्यान पोलीस पथकाने ग्रामपंचायत कार्यालयातील कार्यालयीन व्यवस्था आणि गावाची एकूण स्वच्छता व शिस्तीचे निरीक्षण केले. गावची व्यवस्था अत्यंत उत्तम असून, ग्रामपंचायत कार्यालयाचे कामकाज उच्च दर्जाचे आणि सुव्यवस्थित असल्याचे मत स.पो.नि. साळवेंनी व्यक्त केले