रांजणगाव गणपती पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत यंदा राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून,पिंपरी दुमाला येथील संदीप शिवाजी सोनवणे या उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल करताना केलेल्या अनोख्या आंदोलनात्मक प्रवेशाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.गळ्यात खिळ्यांचा पट्टा आणि कांद्याची माळ परिधान करून हा उमेदवार थेट शिरूर येथे अर्ज भरण्याच्या ठिकाणी दाखल झाला.