सांगोला: माहेरी आलेल्या विवाहितेचा गळफास घेऊन मृत्यू; अजनाळे लिगाडेवाडीतील घटना
अजनाळे (ता. सांगोला) येथील निकिता गुंडाराम शिंदे (वय २५) या विवाहितेने पत्र्याच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अनमोल गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. निकिता काही दिवसांपासून माहेरी राहत होती. आई व भावाच्या अनुपस्थितीत तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.