कापूस खरेदीसाठी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) कडून लागू करण्यात आलेल्या ऑनलाईन स्लॉट बुकिंग प्रणालीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांबाबत राजुरा विधानसभेचे आमदार श्री. देवराव भोंगळे यांनी राज्याचे पणन मंत्री ना. जयकुमारजी रावल यांची त्यांच्या विधिमंडळ दालनात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.