उदगीर बिदर रोडवर रिलायन्स पेट्रोल पंपा जवळ रस्त्याच्या कडेला उभा असणाऱ्या मालवाहू ट्रकला आग लागल्याची घटना १० डिसेंबर रोजी रात्री साडे सात वाजेच्या दरम्यान घडली आहे, ट्रक मधील कॅबिन मध्ये स्फोट झाल्याने भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत होती मात्र कंटेनर चालकाने आग कशी लागली याची माहिती माध्यमासमोर बोलताना दिली आहे, सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही, अहमदाबाद येथून हा कंटेनर हैद्राबादकडे जात असताना ही घटना उदगीर जवळ घडली आहे