भंडारा नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदी सौ. चंद्रकलाताई भोपे व स्वीकृत सदस्य पदी श्री. सचिन कुंभलकर, ॲड. कैलासजी भुरे व चैतन्य उमाळकर यांची वर्णी लागली आहे. तुमसरमध्ये उपाध्यक्ष पदी श्री. सचिनजी बोपचे व स्वीकृत सदस्य म्हणून शैलेश मेश्राम, पवनी येथे उपाध्यक्ष पदी श्री. सोनू बावनकर व स्वीकृत सदस्य म्हणून सौ. भावनाताई भाजीपाले, तर साकोली नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदी सौ. रोहिणी मुंगुलमारे व स्वीकृत सदस्य पदी श्री. नितीनजी खेडीकर यांची निवड झाली आहे.