“महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ, देवा भाऊंचा लाडका मी आहे. तिजोरीच्या चाव्या माझ्या चुलत्याकडे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझे संबंध अत्यंत चांगले आहेत,” असे वक्तव्य भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सत्यजित कदम यांनी केले. आज रविवारी सकाळी राहुरी फॅक्टरी येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, “विरोधात असतानाही शिंदे साहेबांनी देवळालीच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे भविष्यात देवळालीच्या विकासकामांसाठी कुठलीही अडचण येणार नाही.