बुलढाणा जिल्ह्यातील उदयनगर येथील 28 वर्षीय युवक 4 जुलै रोजी हरविल्याची नोंद 5 जुलै रोजी दुपारी 4 वाजता अमडापुर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.उदयनगर येथील शेख तस्लीम शेख सलीम हा 28 वर्षीय युवक कोणाला काही न सांगता बेपत्ता झाला असून त्याचा मित्र व नातेवाईकाकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आला नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद अमडापुर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.