जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल सोमवारी (ता.९) जाहीर झाले. खुलताबाद येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात आणि शांततेत संपूर्ण प्रक्रिया पार पडली.खुलताबाद तालुक्यातील जिल्हा परिषद गटांमध्ये भारतीय जनता पार्टी ने क्लीन स्वीप करत वर्चस्व सिद्ध केले.