चाळीसगाव तालुक्यातील वडाळा वडाळी येथील वनाबाई प्रभाकर पाटील यांच्या शेळीपालन व्यवसायाला सेवा सहयोग फाउंडेशन, पुणे च्या मदतीने मोठे बळ मिळाले आहे. आर्थिक अडचणीमुळे वनाबाईंना आपल्या १२ शेळ्यांसाठी वर्षानुवर्षे सुरक्षित व स्वतंत्र शेड उभारणे शक्य झाले नव्हते. पूर्वीची स्थिती: कुटुंबाचा उदरनिर्वाह ३० गुंठे शेती व १२ शेळ्यांवर अवलंबून. शेळ्यांना दिवसा शेतातील झाडाखाली तर रात्री असुरक्षित आणि अस्वच्छ असलेल्या म्हशीच्या गोठ्यात ठेवावे लागत असे, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत