तेल्हारा: मनब्दा येथे स्वस्तिक पॅटर्न अंतर्गत वृक्षारोपण
Telhara, Akola | Apr 23, 2024 तेल्हारा तालुक्यातील मनब्दा जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वस्तिक पॅटर्न वृक्षारोपण आज दुपारी तीन वाजता करण्यात आले.ए. एस. नाथन यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला.उद्घाटन सरपंच सीमा पाथ्रीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी नाथन यांचा सत्कार केला. सरपंच पाथ्रीकर यांनी विचार व्यक्त केले. यशस्वितेसाठी ग्रामस्थांनी परिश्रम घेतल्याचे बजरंग पाटील यांनी सांगितले.