उदगीर: औरंगपुरा भागात रस्त्यावर गाडी लावण्याच्या कारणावरून वाद,दोघांवर गुन्हा दाखल
Udgir, Latur | May 13, 2025 उदगीर शहरातील औरंगपुरा भागात गाडी रस्त्यावर लावण्याच्या कारणावरून उद्भवलेल्या वादातून छतावरून लोखंडी अँगल व दगडफेक करुन एकाला दुखापत केले. याप्रकरणी रविवारी ११ मे रात्री उशिरा उदगीर शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.१० मे रोजी रात्री अकराच्या सुमारास फिर्यादीने आरोपीतांना तुमची गाडी रस्ताच्या बाजुला लावा असे म्हणाले असता आरोपीने संगनमत करून फिर्यादीस लाथा बुक्क्याने,चापटाने,लोखंडी अँगलने मारहाण करून जखमी केले आहे.