अहिल्यानगर तालुक्यातील मजले चिंचोली येथील वाघुडा परिसरातून आज पहाटे बिबट्या जेरबंद करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेबाबत वनविभागाने परिसरात पिंजरा लावला होता.