सत्ताधाऱ्यांनी कोणतीही ठोस कामगिरी केली नसल्याचा आरोप आता चांगलाच चिघळला असून, शहरात “विकास कुठे?” हा प्रश्न पुन्हा ऐकू येऊ लागला आहे. रस्त्यांची बिकट अवस्था, स्वच्छतेवर दरमहा १५ लाख खर्चूनही स्वच्छता होत नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.याच पार्श्वभूमीवर एकलव्य व जनता ग्रुपने शिवसेना (शिंदे गट) ला जाहीर केलेला पाठींबा हा निवडणूक समीकरणातील निर्णायक टप्पा ठरू शकतो, असा दावा शिवसेना (शिंदे गट) चे प्रशांत मुसमाडे यांनी केला.