भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून मुस्लिम कॉलनी परिसरातून १९ वर्षीय रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले. शहरात दहशत निर्माण करून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा संशयितांचा कट उधळून लावला. सकाळी ७ वाजता ही कारवाई झाली. त्यात पोलिसांनी १५ पेक्षा दुचाकी सुद्धा ताब्यात घेतल्या. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ, गुन्हे शोध पथक आणि एलसीबीचे अधिकारी शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवत कारवाई केली