परळी: नगरपरिषद निवडणुकीत बूथ क्रमांक ११, १२ आणि १ येथे बोगस मतदान झाले, शरद पवार गटाचे देशमुख यांची कार्यालयात पत्रकार परिषद
परळी शहरात नगरपरिषद निवडणुकीत बूथ क्रमांक ११, १२ आणि १ येथे बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते दीपक देशमुख यांनी केला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले की, संबंधित बूथवर नियुक्त करण्यात आलेले अधिकारी हे पूर्णपणे “मॅनेज” करण्यात आले होते. दीपक देशमुख यांनी आरोप केला की, “संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतःच्या हाताने ईव्हीएम मशीनवरील बटन दाबून मतदान केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार लोकशाही व्यवस्थेसाठी अत्यंत घातक आहे. असा आरोप त्यांनी केला आहे.