जालन्यात भाजपच्या उमेदवारी अर्ज वाटपाला ईच्छुकांची मोठी गर्दी. 12-13 डिसेंबर अर्ज वितरण, 14-15 डिसेंबर मुलाखती जालन्यातील संभाजीनगर येथील भाजप कार्यालया समोर ईच्छुक उमेदवारांची लांबच लांब रांग लागल्याचे दिसून आले. आज दिनांक 12 शुक्रवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महापालिका निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी अर्जांच्या वाटपाला आज उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला. भाजप कार्यालयाबाहेर सकाळपासूनच इच्छुक कार्यकर्त्यांच