बुलढाणा: शहरातील तेलगु नगर येथील २६ वर्षीय युवती हरविली
बुलढाणा शहरातील तेलगु नगर येथील २६ वर्षीय युवती २३ नोव्हेंबर रोजी हरविल्याची नोंद २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता बुलढाणा शहर पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.बुलडाणा शहरातील तेलगु नगर येथील खुशबु संजय जाधव ही २६ वर्षीय युवती कोणाला काही न सांगता हरविली असून तीचा मैत्रीणी व नातेवाईकांकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आली नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद बुलढाणा शहर पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे. आली आहे.