देवलाली प्रवरा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते प्रशांत मुसमाडे यांनी जोरदार पलटवार केला आहे. “देवा भाऊजी तुम्ही लाडके असताना शहरात विकासकामे का झाली नाहीत? तिजोरीच्या चाव्या चुलत्याकडे असताना शहराची अधोगती का झाली?” असा सवाल करत मुसमाडे यांनी कदम यांच्यावर टीका केली. आज रविवारी दुपारी पत्रकारांशी ते बोलत होते.