चाळीसगाव: चाळीसगाव शहरातील १५ हिस्ट्रीशीटर गुन्हेगारांची कसून चौकशी; निवडणूक काळात शांतता राखण्याचा कडक इशारा!
चाळीसगाव: आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक सन २०२५ च्या पार्श्वभूमीवर, शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चाळीसगाव शहर पोलिसांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, रविवार, दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील १५ हिस्ट्रीशीटर गुन्हेगारांची कसून चौकशी करण्यात आली.