शासकीय रुग्णालयांतील रक्ताची कमतरता आणि थॅलेसेमिया रुग्णांवरील उपचारात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 ने रुग्णसेवेच्या उद्देशाने एक भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. डिस्ट्रिक्ट 3030 अंतर्गत येणारे नाशिक, जळगाव, नागपूर, अमरावतीसह 11 जिल्ह्यांमधील सर्व रोटरी क्लब सोमवार, दि. 8 डिसेंबर 2025 रोजी एकाच दिवशी हे शिबीर घेत आहेत.