आज दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी 9च्या सुमारास भिवंडी येथील बोरवली गावात ईडी व एटीएसने संयुक्त छापेमारी केली. दहशतवादी कृत्याशी संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरणी ही छापेमारी करण्यात आली. पडघ्या जवळील बोरवली गावामध्ये अनेक घरात छापेमारी करण्यात आली. गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असून 28 जून रोजी कारागृहात मृत्यू झालेल्या साकिब नाचन याच्या दफनविधीनंतर एटीएसची पहिली कारवाई आहे.