जालना: वाढत्या गुन्हेगारीवर पोलीस उतरले मैदानात; जालना शहरात ऑलआऊट ऑपरेशन; 12 जणासह 25 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त
Jalna, Jalna | Feb 10, 2026 जालना शहरात वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी तसेच नियमबाह्य सुरु असलेल्या आस्थापनांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने जालना पोलीस दलाच्या वतीने शहरात ऑलआऊट ऑपरेशन आणि कोबिंग मोहीम राबविण्यात आली. मंगळवार दि. 10 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या मोहिमेत पोलीसांनी 12 जणासह 25 लाख 30 हजाराचा मुद्देमालही जप्त केलाय. ही कारवाई पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. दि. 9 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 11 वाजल्यापासून मोहीम सुरू केली होती.