साकोली: खैरलांजी येथे बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्ताने आदिवासी समाज मेळाव्याचे करण्यात आले आयोजन
साकोली तालुक्यातील खैरलांजी येथे नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन साकोली,युथ फेडरेशन व ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन साकोली यांच्या वतीने क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने आदिवासी समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते आदिवासी जंगल कामगार संघाचे जिल्हाध्यक्ष धर्मराज भरावी यांनी या मेळाव्याचे उद्घाटन केले. या मेळाव्याला मान्यवरांनी मार्गदर्शन केले तसेच गोंडी नृत्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले