पो.स्टे. रामटेक अंतर्गत येणाऱ्या रामटेक - तुमसर मार्गावरील घोटीटोक परिसरात रामटेकडून तुमसर कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात बुलेरो पिकअप वाहनाची समोरून येणाऱ्या एका दुचाकीस कट लागल्याने खाली पडून दुचाकी चालक गंभीर झाल्याची घटना बुधवार दिनांक 4 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजून 51 मिनिटाच्या दरम्यान घडली आहे. गंभीर जखमीचे नाव सिताराम रतनलाल रहांगडाले वय 40 वर्षे रा. शंकर पिपरिया तह. खैरलांजी जिल्हा बालाघाट असे सांगण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर अवस्थेत असल्याचे कळते.