राहुरी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आज सकाळी घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेने व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. भाजीपाला व्यापारी अनिल आबाजी भिसे (रा. तमनर आखाडा) व भिमा मगन देव्हारे हे सकाळीच्या सुमारास ‘येवले वडापाव’ दुकानात नाश्ता करण्यासाठी आले होते.नाश्ता करताना त्यांनी बाजूच्या बाकड्यावर १ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग ठेवली होती. याच दरम्यान दोघांवर पाळत ठेवून बसलेला एक अज्ञात भामटा क्षणात त्या बॅगेवर डल्ला मारत धूम ठोकली आहे.