समुद्रपूर: मोहगाव व तावी येथे मधमाशी संवर्धन अभियान अंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम पडला पार
मोहगाव आणि तावी या गावांमध्ये मधमाशी संवर्धन अभियान अंतर्गत १६ एप्रिल रोजी दुपारी शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांना मधमाशी संवर्धनाची जनजागृती करीत यापासून होणारे फायदे आणि मिळणारे उत्पन्न यासंबंधी सविस्तर माहिती दिली. यावेळी यावेळी सचिन खंडाते, उत्तम गव्हाणे, मंगन संग्रहालयाचे विष्णू बाम्रणवाडे, सचिन उरकुडे यांच्यासह गावातील शेतकरी उपस्थित होते.