उदगीर शहरालगत असलेल्या जळकोट रोड देगलुर रोड, समता नगर, रेल्वे स्टेशन समोर, येणकी माणकी रोड या ठिकाणी साठवून ठेवलेली ७ लाख ७० हजारांची वाळू ग्रामीण पोलीसांनी पकडली. याप्रकरणी ६ डिसेंबर रोजी पहाटे उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.५ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार ते सहाच्या दरम्यान शहरातील जळकोट रोड देगलुर रोड,समता नगर,रेल्वे स्टेशन समोर पोलिसांनी वाळू पकडली आहे