शेवगाव नगरपरिषदेसाठी उत्स्फूर्त मतदान.शेवगाव नगरपरिषदेच्या उर्वरित प्रभागांसाठी आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे. सकाळपासूनच शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून आपला मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी निवडणूक आयोग व पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नव्या मतदारांच्या सहभागामुळे मतदानात लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र दिसून येत असून, यंदा मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता व्यक्त केली