आज दि 1 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता शैक्षणिक संस्थांमधील जात, धर्म, भाषा व लिंगाधारित भेदभाव रोखण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रस्तावित केलेल्या युजीसी इक्विटी रेग्युलेशनला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या निषेधार्थ आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर विविध आंबेडकरी संघटनांनी जोरदार आंदोलन केले. भेदभावमुक्त शिक्षण हा मूलभूत हक्क असून समतेवर आधारित नियमावली तात्काळ लागू करावी, ती अधिक सशक्त व सर्वसमावेशक बनवावी अशी मागणी आंदोलकांनी केली. “UGC समता