भुसावळ: वांजोळा येथून २५ वर्षिय तरुण बेपत्ता
भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथून २५ वर्षिय तरुण बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हरवल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती दि. १३ नोव्हेंबर रोजी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली. याबाबात पोलिसांकाडून मिळालेल्या माहितीनुसार, समाधान वासुदेव सपकाळे असे हरवलेल्या २५ वर्षिय तरुणाचे नाव असून तो दि. १० नोव्हेंबर रोजी कोणास काही एक न सांगता घरातून निघून गेला आहे.