मनरेगा ही ग्रामीण गरीब, कष्टकरी व मजूर कुटुंबांची जीवनवाहिनी असून केंद्र सरकारच्या नव्या निर्णयांमुळे ही योजना कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.शनिवार दि.10 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता पत्रकारांशी संवाद साधतानां काळे यांनी म्हटले की,मनरेगाची कायदेशीर रोजगार हमी,ग्रामपंचायतींचे अधिकार आणि मजुरांच्या मजुरीचे संरक्षण काढून घेतले जात असून याचा थेट फटका ग्रामीण जनतेला बसणार आहे.त्यामुळे काँग्रेसने ग्रामपंचायतीचे अधिकार वाचविण्यासाठी व मजुराच्या मजुरीचे संरक्षणासाठी सर्वांनी पुढे यावे.