छत्रपती संभाजीनगर, आज दि. 4 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता स्मार्ट मीटर बसवणे व वीजदरवाढीच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी करण्याच्या निर्णयानुसार आज महावितरणच्या जुबली पार्क कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. स्मार्ट मीटर हे केंद्र व राज्य सरकारच्या आदेशानेच बसवले जात असल्याचा आरोप भाकपने केला असून, जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न थांबवावेत, असे आवाहन करण्यात आले. लोकांचा विरोध असतानाही गुपचूप व जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा